breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

आमदार रवींद्र धंगेकर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले

पुणे ; पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. पुण्यातील बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत, धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आधी आंदोलन केलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंचा फोटो असलेल्या एका खोक्यावर 50 खोके, असं लिहिण्यात आलं आणि हातात 500 रुपयांच्या बनावट नोटा घेवून घोषणा दिल्या. हाच पैशांचा खोका घेवून धंगेकर आणि अंधारे, पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागात शिरले आणि उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त चरणसिंग राजपूत यांच्यावर भडकले.

हफ्ते घेवून बेकायदेशीर बार आणि पब सुरु असल्याचा आरोप धंगेकरांनी केला. सुषमा अंधारेंनी तर कोणत्या बार आणि पब कडून किती पैसे घेतले जातात, त्याची यादीच वाचून दाखवली. तर चरणसिंग राजपूत यांनी वसुलीचे आरोप फेटाळले असून, अशी कुठं वसूली होत असेल तर चौकशी करणार असल्याचं म्हटलंय आहे.

धंगेकर आणि अंधारेंनी 48 तासांचा वेळ पुण्यातल्या उत्पादन शुल्क विभागाला दिलाय. 48 तासांत बेकायदेशीर पब आणि बारवर कारवाई न झाल्यास, बुल्डोझर चालवण्याचा इशारा अंधारेंनी दिला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी धंगेकरांचा स्टंट असून, माझ्या फोटोचा वापर करुन 50 खोके असं लिहून बदनामी केल्याचं म्हटलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आमदार धंगेकरांविरोधात तक्रारीची तयारीही केली आहे.

हेही वाचा   –  SSC Result | दहावीच्या निकालात सुद्धा कोकणाची बाजी, दहावीचा निकाल ९५.८१ टक्के 

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब आणि बार मालकांचे धाबे दणालले आहे. या अपघात प्रकरणानंतरच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये धडक मोहिमेत शहरातील तसेच जिल्ह्यातील 49 पब आणि बार वर कारवाई करण्यात आली होती. तसेच संबंधितांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर बेकायदेशीर पब आणि बारचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुण्यात काही दिवसांपासून प्रशासनाने पब आणि बारवर कारवाई सुरु केली आहे. पुण्यातील पब संस्कृती विरोधात मनसेने देखील आंदोलन केले होते. एक सही संतापाची अशी मोहिम मनसेने राबवली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button